Breaking News

ठाणे परिवहन सेवेत नवीन 39 बसेस दाखल

ठाणे, दि. 10, नोव्हेबर - केंद्र सरकारच्या पूर्वीच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या 190 बसेसपैकी उर्वरित 50 मधील 39 मिडी  बसेस आज ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या बसेसचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी एकनाथ  शिंदे यांच्या हस्ते आनंदनगर डेपो येथील डिझेल पंपाचेदेखील उद्घाटन करण्यात आले.