Breaking News

काँग्रेसचे विधानपरिषद उमेदवार माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल.


सोलापूर : विधानपरिषदच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप होत असून. दिलीप माने यांचा भाचा निखिल भोसलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याला मदत केल्याप्रकरणी माने यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बलात्कार करुन फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद तक्रारदार महिलेने न्यायालयात दाखल केली आहे. शिवाय दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
हे प्रकरण वर्षभरापूर्वीचं आहे. निखिल भोसलेने तक्रारदार महिलेशी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन ओळख वाढवून मैत्री केली. नंतर तुळजापूर मंदिरात खोटं लग्न करुन पुणे-सोलापूर हायवे रोडजवळच्या एका रुममध्ये शारीरिक संबध ठेवले. त्याचवेळी महिलेचे नग्नावस्थेतील फोटो काढून सोशल मिडियावर टाकण्याची धमकी दिली. आरोपींनी सोलापूर आणि मुंबईतील व्हॉटसअॅप ग्रुपवर फोटो टाकल्याचा दावा महिलेने केला आहे.