Breaking News

कुटुंबातील चौघांचा महिलेवर बलात्कार.

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावातील महिलेवर तिचा पिता व भावासह कुटुंबातील चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. धनेडा गावातील पीडित महिला काही दिवसांपूर्वी घर सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. 


याचा राग आल्याने नराधम पिता व भावासह चार जणांनी या पीडित महिलेवर अत्याचार केले. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर इलाहाबाद न्यायालयाच्या निर्देशानुसार या चार आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली..