Breaking News

तृणमूल काँग्रेसचे माजी नेते मुकुल रॉय भाजपमध्ये

नवी दिल्ली, दि. 04, नोव्हेंबर - तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मुकुल रॉय यांनी आज अखेर भाजपत प्रवेश केला. केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी रॉय यांनी भाजप हा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगितलं.
भाजप प्रवेशानंतर मुकुल रॉय म्हणाले कि, भाजपच्या समर्थनाशिवाय तृणमूल काँग्रेसला पश्‍चिम बंगालमध्ये सत्तास्थापन करता येणार नाही. 1998 आणि 1999 मध्ये भाजपशी हात मिळवणी केल्यानं तृणमूल काँग्रेसला सत्तेत वाटा मिळाला. भाजप हा पक्ष खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी मुकुल रॉय यांच्या कामाचं कौतुक केलं. पश्‍चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता उखडून टाकण्यात मुकुल रॉय यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कम्युनिस्टांचा दहशतवादाशी त्यांनी मोठ्या ताकदीनं लढा दिला.