विनापरवानगी गैरहजर राहणारा महावितरणचा तंत्रज्ञ निलंबित
नागपूर, दि. 09, नोव्हेंबर - महावितरणच्या कामचुकार कर्मचार्यावर निलंबनाची कुर्हाड कोसळली आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी विनापरवानगी क ामावर गैरहजर असलेल्या एका तंत्रज्ञाना आज, बुधवारी तत्काळ प्रभावाने निलंबित केले.
यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत सध्या नागपूर विभागाच्या दौर्यावर आहेत. यावेळी कुही येथील तंत्रज्ञ पी.ए. उईके विनापरवानगी कामावर गैरहजर असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी तत्काळ प्रभावाने उईके यांना निलंबित केले. तसेच जिल्ह्यातील अनेक अभियंता आणि कर्मचा-यांच्या क ामात अनियमितता आढळल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई आणि कारणे दाखवा नोटीस बजावली.
यावेळी खंडाईत यांनी एक हजार आणि पाच हजारापेक्षा अधिक थकबाकी असणा-या ग्राहकांच्या यादीतील अनेक ग्राहकांवर कुठलीही कारवाई केली नसल्याप्रकरणी कुही शहर शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता यांची बदली करून कामात हयगय केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. वेलतूर येथील शाखा अभियंता यांचीही कामगिरी असमाधानकारक आढळून आल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. कुही येथिल ग्राहकांना विहीत कालावधीत वीज देयके वितरित न केल्याने तेथील उच्चस्तर लिपिकास 10 हजार रुपयाचा दंड लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे प्रादेशिक संचालक यांच्या नागपूर ग्रामिण विभागिय कार्यालयाला भेटीदरम्यान आपल्या अधिनस्थ कर्मचार्यावर योग्य नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवित तेथील कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या भेटीदरम्यान मुख्यालयी न राहणार्या कर्मचार्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक यांनी नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता यांना केली आहे. यावेळी कापसी येथील सहायक अभियंता यांना दैनंदिन कामांसह थकबाकीदार ग्राहकांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल, तर मौदा विभागाचे उप व्यवस्थापक यांना लेखा विभागात योग्य समन्वय न ठेवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.