Breaking News

एसटीच्या भरती लिपिक-टंकलेखक ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत लिपिक-टंकलेखक कनिष्ठ पदासाठीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली  आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते, त्यांच्याकडे पुरेशी संगणक यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे ऑनलाईन पद्धतीने परिक्षा आयोजित केली होती. एका दिवसातून 3 बॅच मध्ये 660 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची होती. पण ल ॅबमध्ये केवळ चाळीस विद्यार्थी बसतील येवढीच संगणक क्षमता उपलब्ध होती. त्यामुळे एकाच वेळी एका बॅचला 220 विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नव्हते. परीक्षेच्या पहिल्याच  दिवशी दोन तास वाट बघूनही परीक्षा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.