Breaking News

तिकीट वाटपावरुन नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरचं केला हल्ला.

भाजपचे स्थानिक प्रवक्ते आय के जडेजा यांना तिकीट नाकारण्यात आले त्यामुळे आपल्याला तिकीट न दिल्यामुळे जडेजा यांच्या समर्थकांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाला लक्ष्य बनवलंय. कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्याची घटना घडली.


भाजपने शुक्रवारी आपली पहिली 75 उमेदवारांची यादी जाहीर केलीये. या यादीत 55 विद्यमान आमदारांचा पुन्हा तिकीट देण्यात आलंय. तर 15 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये.

तर दुसरीकडे काँग्रेस एनसीपीच्या दरम्यान जागावाटपावरुन तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गुजरात विधानसभेत युती करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे २० जागांची मागणी केली आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून राष्ट्रवादीचा आता गुजरातमध्ये एकही आमदार नाही.