अहमदनगर क्लबच्या मनोरंजक श्रमपरिहाराला लोकप्रतिनिधींचे बळ
अहमदनगर/प्रतिनिधी 19 : शासनाचा करमणूक कर बुडवून स्वतःची हौस पुरविणार्या अहमदनगर क्लब लिमिटेडने रविवारच्या सुट्टीला यादगार बनविण्याचा संकल्प सोडून आणखी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महसूल मंत्र्यांच्या विशेष मेहेरबानीने चेव भरलेल्या मंडळींच्या या कार्यक्रमाकडे जिल्हा प्रशासनाची नजर असली तर पोलीस यंत्रणेने नरो वा कुंजरो... ची भुमिका घेतली आहे. दरम्यान या क्लबला खासदारांसह आमदारांचे खास आशीर्वाद असल्याचीही चर्चा शहरात आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अहमदनगर क्लब लिमिटेडचा मनोरंजन कर माफ करून महसूल प्रशासनाला तोंडघशी पाडले. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी या क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याने या क्लबने रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून मनोरंजानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्लास्थळी होणार्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून शनिवारी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेत चलते रहो, हम है चा आशीर्वाद अहमदनगर क्लबला दिला अशी कुणकुण शहरात ऐकायला येत आहे.
अन्न वस्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजांसोबत रस्ते व इतर अत्यावश्यक बाबीं पुरविणे हे शासनाचे काम आहे.अहमदनगर शहारात मात्र या मूलभूत गरजांपेक्षा मन प्रफुल्लीत करणारे वेधक कार्यक्रम घेणार्या मंडळींना उत्तेजन देण्यात लोकप्रतिनिधी हशील मानू लागल्याचे दिसते. वेधक वेचक कार्यक्रमांमुळे मन फुलते, अंग शहारते आणि गुदगुदल्या करणारा अनुभव मिळतो म्हणून असेल कदाचित अहमदनगरचे खा.दिलीप गांधी आणि आ.शिवाजीराव कर्डीले या दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सरकारच्या डोळ्यात धुळ फेकून मनोरंजन कर भरण्यास नकार देत एका अर्थाने कायद्याचा द्रोह करणार्या अहमदनगर क्लब लिमिटेडच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अहमदनगर क्लब लिमिटेडचा मनोरंजन कर माफ करून महसूल प्रशासनाला तोंडघशी पाडले. त्यानंतर त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी या क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याने या क्लबने रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून मनोरंजानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्लास्थळी होणार्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून शनिवारी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेत चलते रहो, हम है चा आशीर्वाद अहमदनगर क्लबला दिला अशी कुणकुण शहरात ऐकायला येत आहे.
अहमदनगर शहर आज विविध प्रश्नांनी घेरले आहे. पिण्याच्या पाण्यापासून गटारीच्या समस्यांपर्यंत, रस्त्यांवरील खड्ड्यांपासून उड्डाणपुला पर्यंत अनेक समस्यांनी ञस्त झालेल्या नगरकरांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी या लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. मात्र धनदांडग्यांच्या अहमदनगर क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची तयारी पाहून नेत्रसुख घेण्यासाठी वेळ खर्च केला जातो. ही विसंगती लोकप्रतिनिधींच्या हेतूवर शंका व्यक्त करीत आहे.