Breaking News

'हरियाणाची छोरी' छिल्लरनं यंदाचा मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकावला.


'हरियाणाची छोरी' मानुशी छिल्लरनं यंदाचा मिस वर्ल्ड 2017 चा किताब पटकावलाय. तब्बल ११८ देशांमधल्या सौंदर्यवतींना मागे टाकून मानुशींनी विजयी मुकूट परिधान केलाय.

20 वर्षीय मानुशी ही हरियाणा येथील रहिवासी आहे. मानुशी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मानुशीनं याआधी मिस हरियाणाचा किताब जिंकला होता. तसंच मानुशीनं यंदाचा फेमिना मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. मानुशीही मिस वर्ल्ड स्पर्धेत 67 विजेती ठरली आहे. या स्पर्धेत द मिस मेक्सिको दुसऱ्या स्थानावर तर मिस इंग्लंडला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

या प्रश्नामुळे जिंकली मानुशी
मिस इंडिया मानुशीला इतर स्पर्धकाप्रमाणे एक प्रश्न विचारला गेला. कोणत्या व्यवसायात सर्वात जास्त पगार मिळाला पाहिजे आणि का ? असा सवाल मानुशीला विचारला गेला. यावर मानुशीने उत्तर दिलं की, "सर्वात जास्त मान आणि सन्मान हा आईला मिळाला पाहिजे. आणि राहिला प्रश्न पगाराचा तर आईला आपण पगार देऊ शकत नाही. तिला फक्त प्रेम, सन्मानच दिला पाहिजे."