भावी शिक्षकांना परीक्षेचा ट्रीपल-डोज
अहमदनगर, दि. 08, नोव्हेंबर - राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी.ई.टी.सक्तीची करणा-या राज्याच्या शिक्षण विभागाने आता नवीन आदेश क ाढून टी.ई.टी.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना यापुढे अभियोग्यता आणि बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या चाचणीची कार्यवाही डिसेंबर पासून सुरू क रण्यात येणार आहे. राज्यात 15423 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी शिक्षक भारतीचे नेते सुनिल गाडगे यांना दिली.
अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीसाठीची कार्यवाही डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे.शिक्षकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.असे राज्य सरकार म्हणते.पण खरोखरच शिक्षकांची भरती केली जाणार आहे का,असा प्रश्न शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांना केला.त्यावर त्यांनी शिक्षक भरती केली जाईल असे सांगितले.आता शिक्षकांना नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
राज्यातील स्थानिक स्वरज्य संस्थांसह खाजगी अनुदानित,अंशत: अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणसेवक पदांच्या भरतीसाठी सक्तीची करण्यात आलेली पहिली अभियोग्यता(120 गुणांची व प्रश्नही 120 गुण) व बुध्दिमत्ता चाचणीसाठी 80 गुण प्रश्नही 80 गुणांचे (अॅप्टिटयूड टेस्ट)12 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत होणार आहे.ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. गुणवत्ता असलेले शिक्षक सेवेत आणण्यासाठी वशिक्षक भरती मध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हीचाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे वेळापत्रक परीक्षा परिषदेने जाहिर केले आहे.या परीक्षे साठी अर्ज ऑनलाईन भरता येईल.परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकीग,क्रेडिट व डेबीट कार्डाच्या माध्यमातून करायचे आहेत.ऑनलाईन अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जोडायची नाहीत. मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस आधिन राहून उमेदवारांना परीक्षेला प्रवेश दिला जाईल. अर्जात दिलेली माहिती व मुळ कागदपत्रावरी माहिती यात तफावत आध्ळल्यास त्या उमेदवरांचा प्रवेश रद्दठर विला जाईल. असे परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात 15423 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेला उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असेल. परीक्षा देणा-या उमेदवारास परीक्षा संपल्यानंतर उमदेवाराचे गुण लगेच समजतील, असे सुनिल गाडगे यांनी सांगितले.