Breaking News

सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्र्यांजवळ जाणारा तरुण ताब्यात

नगर, दि. 05, नोव्हेंबर - राळेगणसिद्धी येथे कार्यक्रमादरम्यान सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्र्यांजवळ जाण्याचा प्रयत्न करणा-या प्रशांत कानडे (वय 25) या तरुणाला पोलिसांनी  ताब्यात घेतले. नोकरीबाबत निवेदन देण्यासाठी प्रशांत थेट व्यासपीठाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला रोखले.
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आज राळेगणसिद्धीत होते. त्या वेळी हा प्रकार घडला. प्रशांत हा मूळचा मेहेकरीचा (ता. नगर) रहाणारा आहे. प्राथमिक  माहितीनुसार, प्रशांत मूकबधीर असून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. बँकेत शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करत होता. या संदर्भात  तो मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयातही गेला. मात्र त्याचे काम न झाल्याने तो निराश झाला होता.