Breaking News

व्हीएनआयटीच्या 60 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण

नागपूर, दि. 05, नोव्हेंबर - नागपुरातील विश्‍वेश्‍वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात व्हीएनआयटीवर सध्या डेंग्यूच्या आजाराची संक्रांत कोसळली आहे. संस्थेतील  सुमारे 60 विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली असून मॅथेमॅटिक्स विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र विक्रम अवस्थी हे अत्यवस्थ असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  व्हीएनआयटीचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी बोलताना ही माहिती दिली.
देशभरातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये समावेश असलेल्या नागपुरातील व्हीएनआयटीमध्ये विवध राज्यांमधून विद्यार्थी इंजिनिअरींग करण्यासाठी येतात. भारतातील 31  स्वायत्त संस्थांमध्ये व्हीएनआयटीचा समावेश होतो.
या ठिकाणी विविध अभ्यासक्रमाचे सुमारे 3 हजार विद्यार्थी असून त्यांच्या निवासासाठी संस्थेच्या परिसरात 12 मुलाचे आणि 2 मुलींचे वसतीगृह आहेत. शहरातील अंबाझरी  तलावानजीक असलेला हा परिसर झुडपांनी वेढलेला असून
गेल्या महिनाभरापासून संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांना डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भातील अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 60 विद्यार्थी आणि 4 प्राध्यापकांना डें ग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. तर मॅथेमॅटिक्स विभागप्रमुख
डॉ. डॉ. विरेंद्र विक्रम अवस्थी यांची प्रकृती चिंतजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. डॉ. अवस्थी यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे रूग्णालयात दाखल  करण्यात आले. त्यादरम्यान त्यांना हृदय विकाराचा
झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्याशिवाय सुमारे महिनाभर आजारी राहिल्यामुळे काही विद्यार्थ्यांना सेमिस्टरची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे या  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही झाले. विशेष म्हणजे
वारंवार संपर्क करूनही महापालिकेकडून व्हीएनआयटीला डेंग्यू नियंत्रणासंदर्भात फवारणी वा इतर कुठलीही मदत झालेली नाही.
झाडे कापली, फॉगिंग केले- डॉ. चौधरी
यासंदर्भात माहिती देताना संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, दिवाळीच्या सुमारास संस्थेतील काही प्राध्यापक आणि विद्यार्थी डेंग्यूमुळे आजारी पडलेत. यासंदर्भात  व्हीएनआयटी प्रशासनाने महापालिकेला संपर्क
करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुटीचा कालावधी असल्यामुळे महापालिकेकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. याकाळात काही विद्यार्थ्यांना आजारपणामुळे परीक्षा देखील देता आली  नाही. त्यामुळे आरोग्याची परिस्थीती
अधिक चिघळू नये यासाठी आम्ही स्वत: वॉटर फॉगिंग आणि झाडे कापण्याचा निर्णय घेतला. आमच्या हाती जेवढ्या उपाययोजना होत्या तितक्या करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे  प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.