भीमा पात्रात महसुल पथकाची कारवाई ,तस्करांच्या तीन बोटी फोडल्या
श्रीगोंदा/प्रतिनिधी/-श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात वाळूतस्करी जोमात सुरु असल्याची बातमी दैनिक लोकमंथन या वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली.जिल्हाधिकारी कार्यालय नगर, तहसीलदार श्रीगोंदा, तहसीलदार दौंड यांची संयुक्त कारवाई करत भीमा नदी पात्रात तीन बोटी फोडून वाळु तस्करांचा नऊ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात वाळू तस्करिला लगाम बसेल ?अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली
प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलली. जिल्हाधिकारी कार्यालय नगर, तहसीलदार श्रीगोंदा, तहसीलदार दौंड यांची संयुक्त कारवाई करत अनगरे, आर्वी, देऊळगाव, परिसरातील 3 अवैध उत्खनन करणाऱ्या बोटी जाळून नष्ट करण्यात आल्या आहेत. वाळू तस्करांचे अंदाजे 9 लाखांच्या मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
सदर कारवाई ही सकाळी 12 ते 3 वाजे दरम्यान करण्यात आली आहे.सदर कारवाईत जिल्हाधिकारी कार्यालयतील बामणे खनिकर्म अधिकारी, महेंद्र माळी तहसीलदार श्रीगोंदा, तलाठी अनगरे, पोटे, बुरकुल तलाठी, भावसार तलाठी गार, माने तलाठी , दिवेकर तलाठी आलेगाव, एडूळे तलाठी देऊळगाव, अशोक मासाळ यांनी संयुक्त पणे सदर कारवाई केली आहे. यापुढे देखील अशीच संयुक्त कारवाई करून वाळू चोरी रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे