Breaking News

बांधकामने खड्डे बुजविले; मनपाला मुहूर्त मिळेना

या वर्षीच्या पावसाने शहरातील तसेच रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली असून रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असुन त्याकडे बांधकाम विभागसह, मनपा विभागानेही पाठ फिरवली असल्याचे चित्र होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येईल, असे जाहीर केले. 


त्यानुसार आतापर्यंत नगर जिल्ह्यातील 50 टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. यातुन बांधकामने खड्डे बुजविले असल्याचा दावा जरी केला असला तरी अनेक ठिकाणी काम सुरु होती, परंतु मनपाला खड्डे बुजविण्याचा मुहर्त कधी सापडणार हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

शहरातील विविध भागात सध्या वाहतुक कोंडी आणि रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही, मनपा नेत्यांनी आणि बांधकाम विभागाने तर पुर्णपणे याकडे दुर्लक्ष केले आहे.
शहरातील दिल्लीगेट, माळीवाडा, सावेडी, सर्जेपुरा, तोफखाना आदिसह विविध भागात सध्या रस्ते कमी आणि खड्डे जास्त असल्याने यातुन विविध ठिकाणी रोजच छोटे मोठे अपघात होताना दिसत आहे. 

शहरातील महामार्गावरुन जाणारे रस्ते बांधकाम विभागाने तातडीने दुुरुस्त करण्याची मागणी महापौर सुरेखा कदम यांनी केली होती. याला प्रतिसाद देत बांधकाम खात्याने शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौकातील रस्ता तातडीने दुरुस्त केला आहे. 

महापौरांनी दिलेल्या पत्राची दखल बांधकामने तातडीने घेतली असल्याचे सांगण्यात येत असताना, शहरातील नागरिकांनी महापौर यांना दिलेले रस्त्याचे भाग्य कधी उजळणार आणि या रस्त्यांच्या कामाल कधी मुहर्त मिळणार असाच काहीसा प्रश्‍न विचारला जात आहे. शहरात विविध प्रश्‍न प्रलंबित असताना रस्त्यांचा प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात भेडवसावत असताना याकडे मनपा विभाग कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

मनपा जबाबदारपणे कधी वागणार ? 
शहरामधून जाणारे सार्वजनीक बांधकाम खात्याचे रस्ते तातडीने दुरुस्त करुन द्यावेत असे पत्र महापौर सुरेखा कदम यांनी बांधकाम विभागाला पाठवले होते. यानंतर सार्वजनिक बांधकम विभागाच्या वतीने पत्रकार चौक ते एसपी कार्यालय येथील उखडलेला रस्ता पुर्ण पणे दुरुस्त केला आहे. मात्र महापौरांनी नगरकरांनी दिलेल्या (निवेदन) तथा पत्राची दखल कोण घेणार असाच काहीसा प्रश्‍न आता नगरकर विचारताना दिसत आहे. शहरातील रस्ते कधी दुरुस्त होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभारी राजचा प्रभाव कायम 
शहरात सत्तांतर होण्या अगोदर मनपाने सुंदर नगर व स्वच्छ नगर, खड्डेमुक्त नगर अशा घोषणा दिल्या होत्या. परंतु सत्ता येताच आता शिवसेने घुमजाव केली आहे की काय असाच काहीसा प्रश्‍न पडला आहे. महानगरपालिकेची वसुली धिम्या गतीने असल्याने महावितरण कंपनीने विज खंडीत केली होती. प्रभारी आयुक्त पावले यांनी मध्यस्ती केली नसती तर हा प्रश्‍न निश्‍चितच जटील बनला असता, मात्र प्रभारी राज असतानाही महत्त्वाच प्रश्‍न पालवे यांनी मार्गी लावल्याने प्रभारी राज पहिल्यांदाच मनपात प्रभावी ठरले आहे.