कोपर्डी प्रकरणी तीनही आरोपी दोषी, २१ नोव्हेंबरला निकाल
अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणार्या कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणी जितेंद्र शिंदे,नितीन भैलुमे व संतोष भवाल या तीन ही आरोपीं वरील दोष साबित झाल्याने अहमदनगर च्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपी दोषी असल्याचे शनिवारी जाहीर केले.21 नोव्हेंबर ला शिक्षेबाबत सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.
शनिवारी सकाली 10 च्या सुमारास आरोपींना जिल्हा न्यायालयात आणले होते.न्यायालयाचे कामकाज सुरु झाल्यानंतर न्यायाधीश श्रीमती केवले यांनी तीन ही आरोपी कट कारस्थान करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार व तिचा खून केल्या प्रकरणी दोषी असल्याचे जाहीर केले.21 नोव्हेंबर (मंगलवार)रोजी सुनावणी होणार असून न्यायालय आरोपींना शिक्षा जाहीर करणार आहे.कोपर्डी प्रकरणी आरोपी दोषी असल्याचे न्यायालयाने जाहीर केल्यानंतर कोपर्डी गावात समाधान व्यक्त करण्यात आले.

आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती आरोपींन शिक्षा काय दिली जाणार याची.सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय प्रभावीपणे बाजू मांडली.विशेष म्हणजे या घटनेत कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसूनही निकम यांनी जोरदार युक्तीवाद करून आरोपीं विरूध्द परिस्थितीजन्य पुराव्यांचे आधारे भक्कम पणे बाजू मांडली आहे.शनिवारी न्यायालय परिसर व कोपर्डी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.