Breaking News

नागझरी येथील शेतकर्‍याचे भात भरलेले उडवे जळून खाक


पालघर, दि. 18, नोव्हेंबर - पालघर जिल्ह्यातील नागझरी येथील शेतकरी नताराम पावडे यांच्या शेतावरील पूर्ण भात भरलेली 2 उडवींना अज्ञात व्यक्तींनी आग लावली. यात शेतकर्‍याचे हजारोंचे नुकसान झाले असून या वर्षातील उत्पन्नाचा एक ही दाना घरी पोचला नाही. आगीचा वणवा लागल्याने होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यात पिकासाठी केलेले परिश्रम आणि त्यातच परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍याला खर्चीक बाब आली आणि त्यातच परत आपले संपूर्ण पीक डोळ्यासमोर जळताना पाहून शेतकरी कोलमलून पडला. तरी शेतकर्‍यांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.