औरंगाबाद, दि. 18, नोव्हेंबर - हर्सूलच्या यात्रेत प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर करणा-या मालकाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी पक्षातर्फे पोलीस उपनिरीक्षक दादाराव कोंडीराम बनकर यांच्या तक्रारीनुसार 4 ते 7 नोव्हेंबरदरम्यान हर्सूलच्या वार्षिक यात्रेमध्ये प्रदर्शन आयोजकांनी व प्राणी मालकांनी त्यांच्या ताब्यातील प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर केला. त्यांच्या जवळील घोडे व इतर प्राण्यांचे मनोरंजनासाठी प्रदर्शन भरविले. प्राण्यांना दोरीने मारहाण करून धातूने टोचून प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिली. याप्रकरणी प्राणी मालक व आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार चाबुकस्वार करीत आहेत.