रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार
नागरदेवळे (ता.नगर) येथील देवनगरी कॉलनी परिसरात आ.अरुणकाका जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतूनकाँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल देवनगरी कॉलनीतीलनागरिकांच्या वतीने आ.संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अभिजीत खोसे, संभाजी पवार, संजय सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासाला प्राधान्य दिले जाते. शहरासह उपनगरात अनेक विकासात्मक कामे मार्गीलावण्यात आली असून, जाती-पातीच्या राजकारणाला येथे थारा दिला जात नाही. भिंगार येथील रस्त्याच्या मधून गेलेल्या पाईपलाइनमुळे रस्ता खराबहोत आहे. यासाठी बाहेरुन पाईपलाइन टाकण्याचे काम चालू असून, लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचनागरदेवळे परिसरासाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल व ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल महेश झोडगे यांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कांतीलाल बोरा यांनी केले. याप्रसंगी दिपक लिपाणे, बाबासाहेब चव्हाण, मुकुंद बीदे, होडशीळ, अशोक शेजवळ, पांडुरंग हराळे,सौ.गायकवाड, सौ.बेदरकर, सौ.कराळे, सौ.मुळे आदिंसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.