मराठा बटालियनच्या माजी सैनिकांचा स्नेह मेळावा उत्साहात
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुभेदार मेजर बजरंग बर्गे, सुभेदार भिकाजी भागवत, नारायण राऊत, बाळासाहेब थोरात, सुभेदार भाऊसाहेब कर्पे, दत्तागायकवाड, अरुण नवले, सुभेदार म्हातारदेव ठोंबरे, हरिदास गायवळे, अच्युत साठे, विलास लगड, अरविंद पवार, अर्जुन कराळे, बाबु बेरड, संतोष रासकर,संजय पुंड, बाळू गिते, तानाजी शिंदे, उल्हास बडे आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. भारत मातेच्या प्रतिमेचेपुजन करुन, दीपप्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. १७ मराठा बटालियनला रुईवा हा सैन्यातील सन्मानाचा पुरस्कार देण्यात आला होता. यासन्मानाच्या प्रित्यर्थ या मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी सैनिकांणी रुईवा नांव लिहिलेली गांधी टोपी परिधान केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलनताराचंद गागरे यांनी केले. आभार सुभेदार भाऊसाहेब कर्पे यांनी मानले.