Breaking News

लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय होणार - अब्दुल सत्तार

औरंगाबाद, दि. 18, नोव्हेंबर - लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर जवळपास एक लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पैठण येथे केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. 



काँग्रेसने पैठण येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यासभेत बोलताना अब्दुल सत्तार यांनी हा दावा केला. शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्या विजयाचा दावा करणा-या सत्तार यांनी करण्यामागचे कारण काय याची चर्चा सभेनंतर होती. खोतकर यांच्या उमेदवारीला काँग्रेस पाठिंबा देणार काय असे प्रश्‍न लोकांनी उपस्थित केले. या जनआक्रोश सभेत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.