मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कोर्टात गेल्यावरच मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही
औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कोर्टात जात नाही, तोपर्यंत काही होणार नाही, असे बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाला सांगितले. आज रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित अधिका-यांच्या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री औरंगाबादला आले होते. तेव्हा मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले आणि आरक्षणाबाबत चर्चा केली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सरक ारच्या बाजुने या विषयात करण्यात येत असलेल्या सर्व प्रयत्नांची सविस्तर माहिती या शिष्टमंडळाला दिली. यावेळी ते म्हणाले की शासनाने मराठा समाजासाठी आजवर 19 प रिपत्रके काढली आहेत. महाविदयालयात जावुन त्याची माहिती घ्या सरकार मराठा समाजासाठी काय करीत आहे हे पाहा असे ते म्हणाले.
