Breaking News

डीएसकेंच्या घर आणि कार्यालयावर पोलिसांचा छापा

पुणे, दि. 03, ऑक्टोबर - फसवणूक झाल्याच्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने आज (गुरुवार) पुणे आणि मुंबई स्थित डीएसके यांच्या घरावर व अन्य 5 ठिक ाणी आज पोलिसांनी छापे मारले. मात्र, यावेळी डीएसके घरी नव्हते. आतापर्यंत पोलिसंकडे आलेल्या तक्रारीतील माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ती किमान 10 कोटी  रुपये असल्याचा अंदाज आहे ठेवीदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून त्यात एसआयटी स्थापन करून डीएसके यांच्या सर्व कंपन्यांची चौकशी करण्याची  मागणी करण्यात आली आहे. गेल्या एक महिनाभरापासून डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात सर्वप्रथम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीच्या तक्रारी देण्यास सुरुवात  केली होती. या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या अर्जदारांचे जबाब नोंदविल्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी डी एस कुलकर्णी आणि  त्यांच्या पत्नी हेमंती त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला. मंगळवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे एकूण 44 तक्रारी आल्या होत्या त्यात फसवणूक  झालेली रक्कम 4 कोटी 78 लाख रुपये इतकी होती़ आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात डी़ एस़ के. उद्योगसमुहाविरोधात तक्रार देणा-या ठेवीदारांची बुधवारी सक ाळपासून गर्दी झाली होती़ अहमदनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतून ठेवीदार आले होते़ त्यातील बहुसंख्य हे ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी होते़  त्यांनी आपल्याला मिळालेले फंड व अन्य पैसे डीएसके उद्योगसमुहात गुंतविले आहेत़. त्यातील बहुसंख्य लोकांना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मुद्दल अथवा व्याजही मिळालेले नव्हते़  अहमदनगरहून आलेल्या एका दाम्पत्याने सांगितले, की आम्ही आमची सर्व पुंजी 40 लाख रुपये 2004 मध्ये गुंतविली आहे़ त्याचे व्याज गेल्या 2 वर्षांपर्यंत मिळत होते़ पण,  त्यानंतर मिळणे बंद झाले. पुण्यातील एक आजीही येथे आल्या होत्या त्यांनी सांगितले, की मी 7 लाख रुपये गुंतविले आहेत. त्यावरील व्याज हेच म्हातारपणातला आधार होता. पण  आता व्याजही मिळणे बंद झाले मुद्दल मिळाली तरी खूप झाले असे आता वाटते.