जॅकलीनने इंस्टाग्रामवर शेअर केला मार्शल आर्ट्सचा अभ्यास करतानाचा व्हिडीओ.
फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. आपले शारीरिक सौंदर्य व ताकद मिळवण्यासाठी ती कठोर मेहनत करते. अलीकडेच जॅकलीनने इंस्टाग्रामवर मार्शल आर्ट्सचा अभ्यास करतानाचा आपला एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती आपल्या प्रशिक्षकाबरोबर अंग मेहनत घेताना दिसून येत आहे.
याद्वारे तिने सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याविषयी माहिती दिली. याद्वारे आपण सुदृढ व फिट राहात असल्याचे जॅकलीनने सांगितले. हा व्हिडीओ तिच्या इंस्टा स्टोरीचा भाग होता. जॅकलीनच्या या व्हिडीओमध्ये किक बॉक्सिंग व फ्रीहँड कुस्तीचादेखील समावेश आहे. जॅकलीन ही पोल डान्सिंग व मिक्स मार्शल आर्ट्ससारख्या व्यायामासाठी ओळखली जाते.
