Breaking News

हेट स्टोरी-४'ची कथा सत्य घटनेवर आधारित.

हेट स्टोरी सीरिजचे तीनही चित्रपट प्रेक्षकांना भावले होते. आता या सीरिजचा चौथा चित्रपट म्हणजे हेट स्टोरी-४देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या इहाना ढिल्लनने म्हटले आहे की, हा चित्रपट वास्तव आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. 


इहाना म्हणाली, हा प्रेमाचा त्रिकोण, वगैरे नाही, तर बदला घेण्याची कथा आहे. हा मागील तीन चित्रपटांप्रमाणेच थ्रिलर आहे, परंतु तो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे, कारण तो सत्य घटनेवर आधारलेला आहे. हेच कारण आहे की, मी त्यामुळे उत्साहित आहे. 

चित्रपटाचे शूटिंग जवळपास आटोपले असून, मी आपले लंडनचे शेड्यूल पूर्ण केले आहे व आता मुंबईला परतले आहे. मला विशालबरोबर काम करताना खूप मजा आली. ते खूप चांगली व्यक्ती आहेत व खूप हुशारदेखील आहेत.