Breaking News

भूमिकेला किती स्पेस दिली जाईल, याचा विचार केला नव्हता - सिद्धार्थ

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट इत्तेफाकला प्रेक्षकांकहून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सिद्धार्थच्या या चित्रपटाचे मात्र कौतुक होत आहे. याविषयी सिद्धार्थने म्हटले आहे की, चित्रपट साइन करताना या चित्रपटातील आपल्या भूमिकेला किती स्पेस दिली जाईल, याचा आपण मुळीच विचार केला नव्हता. 


सिद्धार्थ म्हणाला, जेव्हा मला एखादी स्क्रिप्ट आवडते, तेव्हा मी त्यातील आपल्या भूमिकेच्या लांबीची चिंता करत नाही. इत्तेफाकमध्ये संपूर्ण कथा अक्षय खन्नाद्वारे सांगण्यात आली असून, चित्रपटातील त्याची भूमिका खूप मोठी आहे. मी कुठल्याही फिल्मी कुटुंबातील नाही. त्यामुळे मला कधीही स्वत:विषयी इन सिक्युरिटी वाटत नाही.

 मी अशी व्यक्ती मुळीच नाही, जी दुसऱ्या व्यक्तीचे काम कमी करण्याचा प्रयत्न करेल. मला नेहमी चांगल्या कलाकारांबरोबर काम करण्याची इच्छा आहे. माझ्याकरिता चित्रपटाची कथा सर्वात जास्त महत्त्वाची असते. ब्रदर्स, अय्यारीसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याविषयी माझे विचार स्पष्ट होते की, माझ्या करिअरमध्ये काही चांगल्या कथा असलेल्या चित्रपटांचाही समावेश व्हावा. 

मला वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. हीच योग्य वेळ आहे, जेव्हा आपण आपल्या भूमिकांबरोबर प्रयोग करू शकतो. मी लाइमलाइटमध्ये येण्यासाठी चित्रपट करण्याऐवजी चांगली कथा असलेले चित्रपट करू इच्छितो