Breaking News

भाविनिमगावात मुख्य रस्त्याची झाली मोठी दुरावस्था

भाविनिमगाव/ वार्ताहर/- भाविनिमगावात मुख्य रस्त्याची झाली आहे मोठी दुरावस्था, यामुळे एकीकडे रस्त्यावरील धुळीने व रोडलगतच्या घाणीने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या व मुलांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले दिसून येते.

शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील गावात प्रवेश करणारे दोन्ही डांबरी रस्ते पुरते उखडले आहे. नवरात्र उत्सव काळात या रस्त्यावर ग्रामपंचायतीने खड्यात मुरुम टाकून रस्ता डागडुजी केली होती. मात्र आज या मुरमाची माती झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या मागे धुळीचे लोट उडत आहे. 

 या रोडलगत असलेल्या सेवा सोसायटी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, रॉकेल वितरण केंद्र, जिल्हा परिषद शाळा, व्यायाम शाळा, मारुती मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, महालक्ष्मी मंदिर परिसर, येथील नागरिकांना धुळीचा त्रास होतोय. हाच रस्ता पुढे ग्रामदैवत भवानी माता मंदिराकडे जातो. 

देवस्थानचे हे गाव पंचक्रोशीत प्रसिध्द असल्याने रोज भाविकांची गर्दी असते.मात्र भाविकांना या खराब रस्त्याचा व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील नागरिकांना तर ही दैना रोजचीच असुन जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही बाजूने रस्त्यावर माती असल्याने लहान मुलांना या धुळीचा कायम त्रास सहन करावा लागत आहे त्याने या शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.