भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आत्माराम कुंडकर
भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी शहरटाकळी (ता. शेवगाव ) येथील आत्माराम कुंडकर यांची नियुक्ती झाली आहे. नगर येथे भारतीय प्रजा सुराज्य पक्षाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रिय अध्यक्ष दशरथ राऊत यांनी कुंडकर यांना नियु्क्तीचे पत्र दिले.
पक्षाचे उपाध्यक्ष कैलास कोळसे, राज्य महासचिव प्रल्हाद जाधव, भगवान ज-हाड आदी या वेळी उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाचा उपयोग करावा. स्वातंत्र्यानंतरही अद्यापही गोरगरिबांना शासकिय योजनांचा लाभ मिळत नाही.
तो मिळवून द्यावा. 5 जानेवारी 2018 रोजी पक्षाचे राष्ट्रिय अधिवेशन होणार असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन दशरथ राऊत यांनी केले. निवडी नंतर बोलताना जिल्हाध्यक्ष कुंडकर म्हणाले, जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात लढा उभारून सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ.
शेतक-यांच्या कांदा, कापूस, ऊस, सोयाबिन यासह अन्य पिकांना हमी भाव मिळत नसल्याने हमी भाव मिळावा. सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी जिल्ह्यात शेतक-यांचा लढा उभारू. गोरगरिबांच्या शासकिय योजनांचे प्रस्ताव लवकर मंजूर होण्यासाठी पक्षाच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा, असा निर्धार कुंडकर यांनी व्यक्त केला. कुंडकर यांच्या नियुक्तीबद्दल परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.
