Breaking News

शनी अमावस्या निमित्त लाखो भाविकांनी घेतले शनी दर्शन

नेवासा/ ता. प्र.:- विविध राज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी शनी शिंगणापूर येथे येऊन शनी दर्शन घेतले . शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमावस्या होती .अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाली असा अंदाज ग्रामस्थनाकडून लावण्यात आला.

शुक्रवारी,१७/११/१७च्या मध्यरात्री राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. मंदिरापासून सुमारे दोन किलो मीटर अंतरावर वाहनांसाठी वाहनतळ करण्यात आले होते . देवस्थान मार्फत पिण्याचे पाणी , आरोग्य , तातडीची अंबुलन्स सेवा यासारख्या सुविधा भाविकांसाठी करण्यात आल्या होत्या .मुंबई येथील मेहता परिवार ,हरियाणा येथील शनिदेव सेवा समिती , दिल्ली चे विशाल भंडारा ,शनी देव मंडळ फरिदाबाद , दिल्ली येथील पंकज मित्तल या दानशूर भाविकांकडून सुमारे 80 हजार भाविकांना मोफत महाप्रसाद देण्यात आला.

कमिशन एजंट हे वेगवेगळ्या मार्गाने भाविकांना मंदिर परिसरात घेऊन येत होते त्यासाठी भाविकांची मोठी लूटमार झाली त्याबाबत अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली . दिवसभरात अनेकदा दर्शनपथ भरले गेले होते व भाविकांची रांग रस्त्यावर गेली होती . संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथील सुमारे 50 युवकांनी शनी शिंगणापूर येथून पायी घेऊन गेले .देवस्थानचे अधिकारी व सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर संध्याकाळ पर्यंत अविरत कष्ट घेऊन यात्रा काळात सर्व व्यवस्था सुव्यवस्थित संभाळली .

दिवसभरात खासदार चंद्रकांत खैरे , अभिनेते आदेश बांदेकर ,आमदार भाऊसाहेब कांबळे , ऑस्ट्रेलियाचे राकेशकुमार , झिम्बाबवे येथील जयेश शाह , माजी मंत्री बबनराव पाचपुते , जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती कैलास वाघमारे यांच्यासह देशातील विविध राज्यातील पदाधिकारी , अधिकाऱ्यांनी शनी दर्शन घेतले . देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर , डॉ रावसाहेब बानकर ,विश्वस्त अप्पासाहेब शेटे , आदिनाथ शेटे , शालिनी लांडे ,उप कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरांदले यांनी आलेल्या दानशूर शनी भक्तांचा देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला . शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या संगीत राऊत यांनी वरिष्ठांच्या आदेशाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.--