Breaking News

नितेश राणेंची व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई, दि. 09, नोव्हेंबर -आमदार नितेश राणे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांची झोप उडाली आहे, अशा आशयाचे व्यंगचित्र नितेश राणे यांनी स्टेट्समध्ये ठेवले आहे. नितेश यांनी वाजले की बारा ! असे स्टेट्सच्या  खालीदेखील लिहीले आहे. हे व्यंगचित्र स्वत: नितेश राणे यांनी काढले आहे.