Breaking News

कन्हैयाच्या सभेला विरोध करणारे 20 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर, दि. 09, नोव्हेंबर - कन्हैया कुमारच्या सभेला विरोध करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांच्या 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. केशवराव भोसले नाट्यगृहात  आज कन्हैया कुमारच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज सकाळपासून येथील परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या  सभेला विरोध करत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साडेदहाच्या सुमारास नाट्यगृहात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कारवाईचा इशारा दिला. अखेर पो लिसांनी 15 ते 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.