नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयाचा राज्यभरातून निषेध
मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत राज्यभरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीतर्फे आज आझाद मैदानात नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे सहभागी झाले होते. राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज टर्निमसवरुन हा मोर्चा काढला होता. त्यानंतर आझाद मैदानात प्रवेश केल्यावर त्यांनी निर्णयाचे श्राद्ध घातले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फक्त अतिश्रीमंतानाच फायदा झाल्याचा आरोप अनेक पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सरकारचा निषेध नोंदवला जात आहे.
