Breaking News

जाहिरातींच्या फलकामुळे एमएसआरडीसी मालामाल

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महसूल वाढीसाठी मंडळानेच राबवलेल्या दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील उड्डाणपुलावर वाढते जाहिरातींचे फलक दिसत असून, या फलकामुळेच एमएमआरडीसी मालामाल झाली आहे. 



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आणि मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक उड्डाणपुलांवरील जाहिरातीतून महसुलामुळे एमएसआरडीसी मालामाल झाल्याचे दिसून आले. राज्यभरात रस्ते विकासाचा विस्तार वाढवत जाणाऱ्या आणि अनेक प्रकल्पांची खडतर वाट सांभाळणाऱ्या एमएसआरडीसीने जाहिरातीतून मिळवलेला महसूल हा एमएसआरडीसीची तिजोरी भरणारा ठरला आहे. 

दक्षिण मुंबईतील जेजे, फिनिक्स मिल्स, वरळी, सायन, एल्फिन्स्टन या पाच उड्डाणपुलांवरील जाहिरातीतून हेच स्पष्ट झाले आहे. एमएमआरडीसीकडून मुंबई-पुणे महामार्ग आणि हे पाच उड्डाणपूल तसेच काही इन्फ्रा. प्रकल्प भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे