मंजुळा शेट्ये प्रकरण : तिघांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बिंदू नायकोडे, वसीमा शेख आणि सुरेखा गुरदेव अशी या तीन आरोपींची नावे आहेत. मंजुळा शेट्ये प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जेलर मनीषा पोखरकर यांच्यासह सहाही आरोपींनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तथापि, जेलर पोखरकर व अन्य दोन आरोपींनी आपले जामीन अर्ज मागे घेतले. त्यानंतर उर्वरित तीन आरोपींच्या अर्जांवर न्यायालयाने सरकारी व बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतले.