Breaking News

महाराष्ट्र गारठला, पुणे, पिपरी-चिंचवड शहरांना देखील हुडहुडी

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - पुणे, पिपरी-चिंचवड थंडी वाढली असून रात्री व पहाटेच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. दुपारचा उन्हाचा चटका सहन करावा लागत असतानाच रात्री  उशिरा मात्र खिडक्या बंद कराव्या लागत आहेत. गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी उबदार वस्त्र वापरण्यास सुरुवात केली आहे. पहाटे लवकर आणि रात्री उशिरा  घराबाहेर असणार्‍यांनी स्वेटर, जर्किनचा आधार घेतला आहे. पहाटे फिरणार्‍यांनीही त्यांची दिनचर्या उशिरा सुरू केली आहे. पहाटे साडेपाच वाजता फिरावयास जाणारे आता सहा- साडे सहाच्या सुमारास बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे चटके आणि सकाळी थंडगार वातावरण अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. पहाटे आणि रात्री  असणारा गारवा आल्हाददायक आहे. त्याचा आनंद लुटताना तरुणाई दिसून येते. याबरोबर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय  घट झाली आहे.तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 12 अंश  सेल्सिअस नोंदविले गेले गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होतो. बंगालचा उपसागर, तामिळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशची किनारपट्टी या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या  क्षेत्रामुळे सध्या तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशमध्ये जोरदार वृष्टी होत आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस राहणार आहे पंजाब आणि उत्तर राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता  आहे.पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. मराठवाड्यातील काही भागातही शनिवारच्या तुलनेत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.  पुणे शहरात रविवारी किमान तापमान 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांतील किमान तापमान
पुणे 13, जळगाव 14.4, कोल्हापूर 19.3, महाबळेश्‍वर 14.2, मालेगाव 15.4, नाशिक 12.2, सांगली 18.6, सोलापूर 15.9, मुंबई 24.5, सातांक्रुझ 22.6, अलिबाग 22.3,  रत्नागिरी 22.3, पणजी 23, डहाणु 20.2, उस्मानाबाद 12.5, औरंगाबाद 15, परभणी 14.5, नांदेड 16.2, अकोला 16.5, अमरावती 16.4, बुलढाणा 16.2, ब्रम्हपुरी 15.3,  चंद्रपूर 18.6, गोंदिया 15, नागपूर 15.2, वाशिम 15.8, वर्धा 15.5, यवतमाळ 14.5