जवानास मारहाण प्रकरणात चार जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी भावकीतील युवराज बाजीराव गोपाळघरे, भरत बाजीराव गोपाळघरे, गोकुळ बाजीराव गोपाळघरे( रा. घुलेवाडी ता.भुम.) व कृष्णा वणवे.( रा.बेदरवाडी. ता.भुम.) या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी विकास भगवान गोपाळघरे( वय २५ वर्षे).हे चार वर्षांपूर्वी आर्मी मध्ये जर्सीम असिस्टंट पदावर कार्यरत असुन, ते सुट्टीवर आपल्या गावी आले होते. दि २८ रोजी सायंकाळी फिर्यादी जवान हे खर्डा येथील बाजारतळ येथे असताना वरील आरोपीही त्या ठिकाणी आले.
व म्हणाले तु पाठीमागील भुम कोर्टत आमच्या विरोधात केलेली केस मागे का घेत नाही? असे म्हणुन लाथबुक्क्याने मारहाण केली. तसेच अरोपी युवराज बाजीराव गोपाळघरे याने रॉड सारख्या वस्तूने पायावर तोंडावर मारहाण केली.
या झटापटीत जवान विकास गोपाळघरे यांच्या गळ्यातील चैन तुटून गहाळ झाली. या मारहाणीत जवान गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जवान विकास गोपाळघरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींना विरोधात गुन्हा दाखल केला असुन सध्या सर्व आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ भिताडे हे करत आहेत.