Breaking News

कूंटनखाण्यावर छापा;मालकीनीला पोलीस कोठडी,मालक फरार.


जामखेड मध्ये कुंंटनखान्यावर टाकलेल्या छाप्यात कूंटनखाना मालकिणीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन मूलींची सूटका करून त्यांना स्नेहालय अहमदनगर येथे ठेवण्यात आले आहे. कूंटनखाना मालक यूसुफ शहा फरार आहे. सदर आरोपी जामखेड पोलिसांना अनेक गून्ह्यात वाँन्टेड आहे.

जामखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,महिला आरोपीच्या मूलाने जामखेड पोलिसांकडे आमच्या घरात वेश्याव्यवसाय जबरदस्तीने अनेक दिवसांपासून चालतो आहे असा अर्ज केला होता. त्यानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट गिऱ्हाईक च्या रूपात पोलिसालाच त्याठिकाणी पाठविले . आणि तेथे वेश्याव्यवसाय चालतो याची खात्री करून घेतली. 


त्यानंतर पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम, पोहेकाँ बापू गव्हाणे, पोना बढे, पोकाँ केकाण, महिला पोकाँ जगताप, यांच्या पथकाने रात्री १०.३० वा आरोपीच्या शहरातील हाडोळा येथील घरी छापा टाकला असता दोन मूली व वेश्याव्यवसायास लागणारे साहित्य, रोख रक्कम सहाशे रुपये आढळून आले. कूंटनखाना मालकीणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मालक यूसुफ शहा पळून गेला. सदर पिडीत मूलींना चौकशी करून पोलिसांनी स्नेहालय अ. नगर येथे सूधारगृहात ठेवले आहे.

शहरातील हाडोळा येथे यूसुफ शहा (सदाफुले वस्ती जामखेड) व अटक केलेली महिला (हाडोळा ) हे दोघे अनेक दिवसांपासून कूंटनखाना चालवत होते. सदर आरोपी महीलेची स्वतः ची मूलगी व मोडलींब जि सोलापूर येथील एक मुलगी यांना राहत्या घरात बंदिस्त करून स्वतःच्या फायद्यासाठी कूंटनखाना चालवत होते. 

 व त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका भागवत होते. यातील पिडीत मूलींकडून वेश्याव्यवसाय जबरदस्तीने करून घेतला जात होता त्यांना मारहाणही केली जात होती.जामखेड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो आहे. हाडोळयासह शहरात असे अनेक ठिकाणी कूंटनखाना सदृश जागा आहेत. जिथे वेश्याव्यवसाय चालतो सदर छाप्यामूळे हाँटेल, लाँज, ढाबे यांचे ढाबे दणाणले आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा