Breaking News

महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्टस् यांचा आंतर्वासिता (इंटर्नशिप) उपक्रम

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - राज्य शासनाच्या विविध विभागात सक्षम मनुष्यबळ सातत्याने विकसित करण्याकरिता राज्य शासनाने टाटा ट्रस्टस् यांच्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकरिता आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची आखणी केली आहे. यात राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्याकरिता 28 उमेदवार 11 महिन्यासाठी मानधन तत्वावर काम करतील.
या उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. राज्य शासन आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त प्रयत्नाने अंमलात आणण्यात येणारे उपक्रम लोकांपर्यंत अभिनव पद्धतीने पोहोचविण्याचे काम निवडण्यात आलेल्या उमेदवारांना सोपविण्यात येणार आहे.
या उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना 20 हजाराहून अधिक मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. या कार्यक्रमांतर्गत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
संहिता लेखक (एकूण पदे- 17) (मराठी) (13), हिंदी (2) आणि इंग्रजी(2) (13 पदांपैकी 7 पदे ही मुंबई कार्यालय, प्रत्येकी 2 पदे ही पुणे आणि विदर्भ कार्यालय आणि प्रत्येकी 1पद हे मराठवाडा आणि नाशिक कार्यालयात असेल), पात्रता-जनसंवाद/पत्रकारिता/संज्ञापन यातील पदवी किंवा जाहिरात, नाट्यशास्त्र, चित्रपट विषयक पदवी अथवा पदवीनंतर संबंधित विषयातील लघुअभ्याक्रमसोशल मीडियासाठी संहिता लेखक - (एकूण पदे - 2) - पात्रता - पदवी + सोशल मीडिया या क्षेत्रातील लघु अभ्याक्रम. ग्राफिक डिझाईनर - (एकूण पदे - 4), पात्रता- फाईन/प्लाईड आर्टमधील पदविका/पदवी. माहिती तंत्रज्ञान साहाय्यक-(एकूण पदे - 2), पात्रता- बीएस्सी, एमएस्सी,एमटेक, बीई (आयटी) (सीएस). व्हिडिओ निमेटर -(एकूण पदे - 2), पात्रता- बारावी + निमेशन विषयातील पदविका. संगीत संयोजक -(एकूण पदे - 1), पात्रता- बारावी+ संगीत विषयातील पदविका.