ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
ठाणे, दि. 11, नोव्हेंबर - ठाणे महापालिकेच्यावतीने आणि फोटो सर्कल सोसायटी, ठाणे यांच्या सहकार्याने 10 नोव्हेंबर रोजी ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
