Breaking News

ऊसाच्या भावासाठी पैठण, शेवगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखणार

औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - उसाच्या भावासाठी उद्यापासून आंदोलन उसाला 3100 रुपये भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी पैठण व शेवगाव तालुक्यातील शेतकरी  आक्रमक झाले आहेत. मागण्या सोमवारपर्यंत पूर्ण न झाल्यास पैठण व शेवगाव तालुक्यातून ऊस वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पैठण व शेवगाव  तालुक्यातील शेतक-यांनी ऊस उत्पादक शेतकरी कृती समितीची स्थापन केली असून शनिवारी व रविवारी समितीची पाटेगाव येथे बैठक घेण्यात आली. यावर्षीच्या गळीत हंगामात  3100 रुपये प्रती क्विंटल भाव मिळावा, ऊस मोजणी काटा पारदर्शी असावा, मागच्या वर्षी ठरल्याप्रमाणे भाव न देणा-या कारखान्यावर कारवाई करावी, कारखान्याने ऊस उत्पादक  शेतकर्यास ऊस तोडणी व हमी भावाचे तीन वर्षांचे करार पत्रक करून द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रविवारी, समितीने शेवगाव तालुक्यातील घोटन येथे  ऊस वाहतूक रोखली. या आंदोलनात माऊली मुळे, चंद्रकांत झारगड, अनिल घोडके, राजुभाई विटभट्टीवाले, बद्री बोबले, संजय मोरे, ज्ञानेश घोडके, सलीम शेख यांच्यासह शेतक -यांनी भाग घेतला.