Breaking News

वीरशैव युवक संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे मुख्यालय रिद्धी सिद्धी हॉलच्यामागे गारखेडा परिसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. शिवा संघटनेच्या वतीने सोलापूर  विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर विद्यापीठ देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी केली नाही म्हणून हा निषेध व्यक्त करण्यात आल्याची माहिती शिवा  संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. हा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम प्रा. मनोहर धोंड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला असल्याची माहितीही या  पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आगामी काळात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.