Breaking News

वेश्यांच्या अड्ड्यावर छापा, तीन महिलांना अटक

बीड, दि. 07, नोव्हेंबर - शहरामध्ये अनेक ठिकाणी लपून छपुन वेेश्या व्यवसाय सुरू आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून वेश्या व्यवसाय  सुरू असून या ठिकाणी काल डीवायएसपीच्या पथकाने धाड टाकली असता चार गुलहाऊसीसह तीन महिला ताब्यात घेण्यात आल्या. या सात जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील वेश्या व्यवसाय करणार्या या महिला नगर येथील असल्याचे सांगण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरात असलेल्या इं दिरा नगर भागात एका ठिकाणी अनेक दिवसापासून वेश्या व्ययसाय सुरू आहे. काल पोलीसांनी सदरील ठिकाणी पाळत ठेवून धाड टाकली असता या ठिकाणी चार पुरूष तीन  महिला आढळून आल्या. वेश्या व्यवसाय करणार्या या तीन महिला अहमदनगर येथील असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुलहाऊसी दादासाहेब मस्के, श्रीहरी  धायगुडे, शेख मुजमील, सय्यद आमेर यांच्यासह अन्य जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई डीवायएसपी खिरडकर, फौजदार दिपाली गिते यांच्यासह आदी कर्मचार्यांनी  केली असून या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजी नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक लाखाळ हे करत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वीच याच परिसरामध्ये एका वेश्या व्यवसाय  अड्ड्यावर धाड टाकून एका अल्पवयीन मुलीची व्यवसायातून सुटका केली होती. सदरील प्रकरण शहरामध्ये चांगलेच गाजले होते.