Breaking News

मुख्याधिकार्‍याचा मनमानी कारभार

अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - जनतेने लोकशाही पध्दतीने निवडून दिलेले असताना देखील केवळ मुख्याधिकार्‍याच्या आडमुठे धोरणामुळे नगरसेवकांना नगरपंचायतीत काम करणे  मुष्कील झालेले आहे, अनेकदा तक्रारी व विनंत्या करूनही मुख्याधिकार्‍याच्या वर्तणूकीत बदल होत नाही, मुख्याधिकार्‍याच्या मनमानी कारभाराला नगरसेवक वैतागले, सहकार्याची व  समंजसपणा दाखवून सुध्दा मुख्याधिकारी अडेलतट्टू भुमिका घेत असल्याने आज वैतागलेल्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेवून कैफीयत मांडली.  मुख्याधिकार्‍याच्या आडमुठ्या धोरणांचा लेखाजोखा सादर करत पुर्णवेळ मुख्याधिकार्‍याच्या नेमणूकीची लेखी मागणी केली. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, लक्ष्मण जगताप, फारूक  आतार, अँड बापुसाहेब गायके, संदिप बेहळे, अंबिका अंबादास इरले, सचिन वडागळे, फिरोजबी पठाण, योगिता सतिष पिपंळे, अर्चना कुर्‍हे या नगरसेवकांनी आज सकाळी जिल्हा धिकार्‍यांची भेट घेतली. निवेदनात म्हटले  की सहामहिन्यापासून नवनिर्वाचीत नगरसेवक नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या विविध योजना व सोईसुविधा  राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्याची भुमिका घेतली जात आहे. पुर्णवेळ मुख्याधिकार नसल्याने कामकाज क रण्यात अडचणी येत आहेत.
 मासीक मिटींग सुध्या वेळेवर होत नाही,  फक्त दोन मिटींगा झालेल्या आहेत.  परंतू त्याचे देखील प्रोसेडींग अपुर्ण असल्याने तिसरी मिटींग घेता आलेली नाही. लेखी मागणी करून  देखील जमा-खर्चाचा तपशील दिला गेलेला नाही.
शहराच्या दृष्टिने महत्वाच्या असणार्‍या पाणी पुरवठा योजनेसाठी असलेल्या भरघोस निधीतून विद्युत मोटारी, जलशुध्दिकरण केंद्राचे काम करणे आवश्यक असताना मख्याधिकार्‍यांनी  स्वताच्या अधिकारात या निधी अंतर्गत कामे न करताच कामाची बिले देण्यात आलेली आहेत. कामेच न करता बिले काढण्यात आल्याने  अशुध्द पाणी पुरवठा होत आहे.
गेल्या महिन्यात तहसिलदार यांच्या समोर उपोषण करून गैरकारभाराची चौकशी  करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. परंतू त्यावेळी देखील नगर पंचायतचे मुख्याधिक ार्‍यांनी सोईस्करपणे दुर्लक्ष केले होते. एवढ्या चुका करून देखील मुख्याधिकार्‍यांच्या वर्तणूकीत बदल न होता दिवसें-दिवस त्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांची सखोल  चौकषी करून कारवाईची मागणी करत नव्याने पुर्णवेळ मुख्याधिकार्‍याची नेमणूकीची मागणी केली आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेवून एक तास झालेल्या या चर्चे संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे अश्‍वासन दिले. त्यानंतर नगरसेवकांनी
नगरपालीका जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस यांची भेट घेवून या तातडीने वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या नगरसेवकांच्या मागणील सकारात्मक प्रतिसाद देत योग्य क ारवाईचे अश्‍वासन दिले.  असे उप नगरअध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगितले.