Breaking News

वाठार स्थानक येथील सरपंचाकडून राज्यातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर

सातारा, दि. 11, नोव्हेंबर - वाठार स्थानक येथील सरपंच व रिपाइ नेते अमोल आवळे व त्यांच्या नऊ सवंगड्यांनी राज्यातील सर्वात उंच असे कळसुबाई शिखर अवघ्या अडीच तासात सर केले. आपल्या डॅशिंग नेतृत्वाने परिचित असणारे व वक्तृत्वाने सर्वसामान्य जनतेची मने जिंकणारे तर कधी गाण्याच्या ठेक्यावर युवा मित्रांसोबत नाचणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे अमोल आवळे यांनी आपल्या नऊ सहकार्‍यांसमवेत महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर कोणत्याही ट्रेकिंगच्या प्रशिक्षणाशिवाय सर केले. या अगोदर आवळे हे आपल्या युवा मित्रांच्या साथीने हरिहरेश्‍वर,रायरेश्‍वर, मुरा,चंदनवंदन, कल्याणगड,जरंडेश्‍वर,वासोटा,नागेश्‍वरी या किल्ल्यांवर वारंवार जात असतात. महिन्यातून किमान एक शिखर किंवा किल्ला सर करण्याचा मानस अमोल आवळे व सवंगड्यांचा आहे .राजकीय व सामाजिक क्षेत्रातील असे शिखर किंवा किल्ले सर करणारे अमोल आवळे हे एक अवलिया ठरत आहेत. कळसुबाई शिखर हे सर करत असताना अवघ्या अडीच तासात न थकता पार केले.आपल्या युवा मित्रांसमवेत हे अहमदनगर जिल्ह्यातील शिखर सर केल्यानंतर या दुर्गप्रेमींना आनंदाचा पारावार उरला नाही. या दुर्गप्रेमींमध्ये अमोल आवळे,सदाभाऊ बेळगुंपे,नितीन चव्हाण, धनंजय माने,चंद्रकांत चव्हाण, संजय गंगावणे सर,रामचंद्र काळोखे, कोरडे सर,किशोर खराडे,भांगरे सर हे होते.