Breaking News

म्हाडाचे 819 घरांसाठीच्या सोडतीचे निकाल जाहीर

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर - मुंबईमध्ये घर घेण्याची इच्छा असणा-या 819 जणांचे स्वप्न म्हाडाने आज पूर्ण झाले. म्हाडाचे 819 घरांसाठीच्या सोडतीचे निकाल आज जाहीर झाले असून मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गटातील या घरांची सोडत सकाळी 10 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातील एका सोहळ्यात काढण्यात आली. यंदाच्या घराच्या लॉटरीसाठी 65 हजार 125 अर्ज आले होते. यावर्षी 972 घरांच्या सोडतीसाठी आलेल्या अर्जदारांचा आकडा एक लाख 36 हजार इतका मोठा होता.
प्रतीक्षा नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील (एससी राखीव) घरांच्या सोडतीमध्ये स्नेहा कांबळे, मृणाल कदम आणि रवींद्र कदम हे विजेते ठरले. तर सोडतीमधील सर्वात महागड्या अशा लोअर परळमधील घरांची सोडत शारदा तंदूर आणि नेहा अगरवाल यांनी जिंकली. परळमधील या घरांची किंमत 1 कोटी 95 लाख रु. इतकी आहे.