Breaking News

दुसर्‍याच्या कामाचे श्रेय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही - बारस्कर

प्रभाग 11चे अजिंक्य बोरकर नगरसेवक असताना आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर करून घेतली होती. आज ती या प्रभागामध्ये दिसत आहेत. आम्ही केलेल्या कामांवर मनपाचे पदाधिकारी व या प्रभागाचे नगरसेवक येऊन उभे राहतात व आम्ही हे काम केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात. 


सत्ता असतानाही प्रभागात विकासकामे करता येत नाही. परंतु मंजूर कामे बंद पाडण्याचे काम हे करीत आहेत. स्वतःच्या कामाचे श्रेय जरूर घ्या, पण दुसर्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी केले.प्रभाग 11मधील एलआयसी कॉलनीत आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ श्री. बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेविका इंदरकौर गंभीर, अशोक पावा, जितेंद्र सदवाणी, अ‍ॅलड. मंगेश सोले, जॅकी नवसानी, मनीष नारंग, जयकुमार रंगलानी, जयंत तांबोळी, निखील भागवानी, वसंत थोरात, धर्मेंद्र भागवानी, उज्ज्वला गांधी, हरिष सचदेव, प्रणव देशमुख, करण भागवानी, सुशील थोरात, विशाल शिंदे, मुजीब सय्यद, प्रतिभा झिने, रेवती तांबोळी, सुमन कोल्हापुरे, मीरा भागवानी, निर्मला पाटील, सविता चांदणे, किरण पिसोरे, कुमार नवले, शैलेश राजगुरू आदी उपस्थित होते.

कुमारसिंह वाकळे म्हणाले की, या भागातील नगरसेवक बालिश बुद्धी असल्यासारखे वागतात. विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. दुसर्याच्या कामाचे श्रेय घेत बसण्यापेक्षा महापालिकेचा सत्तेचा उपयोग विकासकामांसाठी करा. कामे बंद पाडण्यासाठी करू नका. अजिंक्य बोरकर यांना नगरसेवकपदाची संधी दिली. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी स्वतःच्या राजकारणासाठी नगरसेवकपद घालविले. परंतु त्यांना या प्रभागातील विकासाकडे लक्ष देता आले नाही. बोरकर याने मंजूर करून घेतलेली कामे आज प्रभागात सुरू असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा