राहुल गांधी हिंदू नाहीत ?
गुजरात निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल हे आता नव्या वादात सापडलेत, गुजरात प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पण यावेळी त्यांची नोंद गैर हिंदू रजिस्टरमध्ये केली असल्याने या वादाला तोंड फुटलं आहे.
सोमनाथ मंदिरात येणाऱ्या गैरहिंदूंच्या नावाची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाते. त्यानुसार, काँग्रेसच्या मीडिया प्रभारींनी राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद गैरहिंदू रजिस्टरमध्ये केली आहे.