पाणीप्रश्नाबाबत केडगावकरांचे ‘चक्काजाम’ आंदोलन
अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - केडगावमध्ये होणारा अपुरा आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठयाच्या निषेधार्थ आज केडगावकरांनी नगर पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर रास्ता रोको केले. यावेळी मनपाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे महामार्गावर संपूर्ण ’ट्रॅफिक जॅम ’ झाली होती. जवळपास 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
तीस वर्षांपासून केडगावास दिवसाआड, कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र, ही पाईपलाईन बंद करून नवीन कनेक्शन देण्याची योजना म.न.पा. ने आणली. त्यानुसार नाग रिकांनी पैसे भरून नवीन कनेक्शन घेतले. नवीन पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरूही झाला. मात्र, नवीन पाईपलाईन जोडतेवेळी एक दिवसाआड पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मनपा अधिकार्यांनी दिले होते. परंतु हे अशासन 15 दिवसांपुरतेच मर्यादित राहिले. आता या ठिकाणी चार ते पाच दिवसांच्या अंतराने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यात वेळेचे नियोजनही नाही. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यासंदर्भात नागरिकांनी दिवाळीपूर्वीच आयुक्तांना भेटून याबाबत निवेदन दिले होते. दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. परंतु कोणतीच ठोस कार्यवाही न केल्याने केडगावमधील अमितनगर, ताराबाग, केडगाव देवी प रिसरातील नागरिकांनी नगर- पुणे महामार्गावर रास्ता रोको करून मनपाचा निषेध केला.