दादा चौधरी नं.2 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
अहमदनगर, दि. 10, नोव्हेंबर - हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालय नं.2, नवभारत उर्फ सिताराम सारडा विद्यालयाच्या 1967 च्या आकरावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम नुकताच बागडपट्टी, तोफखाना येथील शाळेत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम.सोनवणे होते. सरस्वती पूजन व माजी शिक्षकांचा सत्कार मधुसूदन मुळे, अरुण धर्माधिकारी, गुलाबबाई बोगावत, शं.भा.व्यापारी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी 50 वर्षापूर्वीच्या आपल्या शाळेच्या व शिक्षकांच्या आठवणी जागवल्या व त्या आठवणींमधून रमून गेले होते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढून भावी आयुष्याबद्दल शुभकामना दिल्या. शाळेच्या वास्तूची व शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी सुधीर कोटस्थाने, अनिल पितळे, सुरेश गडाख, रविंद्र राजहंस, प्रदीप नाईक यांनी अपार कष्ट घेतले. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर वर्गाने हिंद सेवा मंडळाच्या मकरंद खेर व शिरिष मोडक यांनी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले. याप्रसंगी प्रा.मधुसूदन मुळे यांनी 1967 च्या बँचच्या विद्यार्थ्यांच्या खोड्या, त्यांच्या मारामार्या, त्यांचा चांगुलपणा, अभ्यासाच्यावेळेला अभ्यास, खेळाच्या वेळेला खेळ, मस्तीच्यावेळी मस्ती अशा विविध गोष्टी विनोदात बोलून सांगितल्या. आज उपस्थित असलेले माजी विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात मोठमोठ्या पदावर काम करत आहे. ही त्यांच्या कुटूंबियांबरोबरच आम्हा शिक्षकांसुद्धा अभिमानास्पद अशीच बाब आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा याच गोष्टी अवलंबिल्या, मनात काही न ठेवता, वादविवाद सोडून झालेली गोष्टी तेथेच विसरुन, पुढील कामास प्राधान्य दिले तर आपण प्रगती साधतो हे लक्षात घ्यावे. असे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास माजी विद्यार्थी सर्वश्री अनिल कुलकर्णी, दत्तात्रय डफळ, श्रीमती तारा इंगळे (भोसले), मदनलाल सारडा, किशोर गुडगिले, श्रीकृष्ण कुलकर्णी, पोपट जामगांवकर, सर्वोत्तम धर्माधिकारी, अरविंद सांब, सुदाम दळवी, डॉ.रमेश काकाणी, मुकुंद कुलकर्णी, विलास कुलकर्णी, अशोक पवळे, रऊफ शेख, दिलीप कुक्कडवाल, हिरालाल पुरोहित, माधव घोलप, श्रीकृष्ण मुळे, रमेश श्रोत्रीय उपस्थित होते.