Breaking News

नगरपरिषदेच्या 120 कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे केला खुलासा


जामखेड : येथील नगरपरिषदेच्या चतुर्थ व तृतीय श्रेणीतील 120 कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता अधिकार्‍यांनी काढुन घेतला असा आरोप केला जात आहे. मात्र या प्रकरणी आमची बदणामी होत असुन कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. आमची कसलीच तक्रार नाही असे नगरपरिषदेच्या 120 कर्मचार्‍यांनी पोलिस प्रशासन व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपरिषदेच्या 120 सफाई कामगारांना शासनाकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर एका तासातच प्रत्येकाच्या खात्यातून सहा ते पंधरा हजार असे एकुण तेरा लाख रुपये अधिकार्‍यांनी काढल्याचा आरोप जामखेड येथील जिव्हाळा फाऊंडेशनच्यावतीने केला होता. तसेच याबाबतचे निवेदन देखील जिव्हाळा फाऊंडेशनने जिल्हाधिकारी यांना दिले होते. मात्र नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी आमची बदणामी होत असुन 120 कर्मचार्‍यांचे पैसे काढले असल्याचे म्हटले आहे.

मात्र आमच्याबरोबर काम करणारे कर्मचारी रमेश रोकडे व उमेश राऊत यांना काम असल्याने व आमच्या पैकी काही कर्मचारी यांना लिहता वाचता येत नसल्याने आम्ही आमच्या वतीने बँकेच्या पे स्लिपा भरणे बाबत सांगतो व आमच्या रकमा देखील बँकेतून स्वतः घेत असतो, आम्हाला आजपर्यंत कोठल्याही कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांनी किंवा पदाधिकार्‍यांनी कुठल्याही प्रकारची रक्कम मागितलेली नाही, तसेच कर्मचारी रमेश रोकडे व उमेश राऊत यांनी कोणत्याही प्रकारची आजपर्यंत आमची फसवणूक केली नसल्याचे या 120 कर्मचार्‍यांनी पोलिस प्रशासन व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर नगरपरिषदेचे कर्मचारी रमेश रोकडे, उमेश राऊत, हितेश वीर, कृष्णा वीर, प्रमोद टेकाळे, शेख रज्जाक, अभिजीत भैसडे, अतुल राळेभात, शंकर बोराट, विजय पवार, आकाश डोके, यांच्या सह्या आहेत.