मिरज तालुक्यातील शेतकर्यांना ट्रॅक्टर वाटप
सांगली, दि. 11, नोव्हेंबर - उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते आज लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, मिरज उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ, मिरज तालुका कृषि अधिकारी एच. एस. मेडीदार यांच्यासह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात नामदेव कांबळे यांना रोटावेटर, शेखर कांबळे यांना पॉवर टिलर व भूपाल कांबळे यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
या योजनेंतर्गत मिरज तालुक्यातून ट्रॅक्टरसाठी एकूण 585 व इतर अवजारांसाठी 840 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जापैकी लकी ड्रॉ पध्दतीने ट्रॅक्टरसाठी 110 व इतर अवजारांसाठी 85 लाभार्थी शेतकर्यांची निवड करण्यात आली. यासाठी एकूण 84 लाख रूपये अनुदान प्राप्त आहे.
शेतकरी निवड झाल्यावर कृषि विभागातील सुचनेनुसार पूर्व संमती देवून शेतकर्यांना ओपन मार्केट मधून त्यांच्या आवडीनुसार ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज अखेर मिरज तालुक्यात एकूण 31 ट्रॅक्टर व 35 इतर अवजारांची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार संबंधीत लाभार्थींच्या खात्यावर 54 लाख रूपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.